Lockdown संपल्यासंपल्या कोरोना काही गायब होणार नाही. आपल्याला त्याच्या सोबत जगायची सवय करायला लागणार आहे.. अर्थात संपूर्ण काळजी घेऊनच.... किमान वर्षभर तरी....
'सवय'
........ डॉ. अनुराधा पंडितराव
......... ०५.०५.२०२०
पाण्यात पडल्यावर,
पोहायची सवय लागायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी !
Weekend ला सिनेमा,
अन् हॉटेलमध्ये जेवण,
घरचं जेवायची सवय जिभेला,
लावायलाच हवी,
आता जरा lifestyle
बदलायलाच हवी!
Exhibitions ला गर्दी,
अन् भरमसाठ खरेदी,
Shopping ला मुरड,
आता घालायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
ऊठसूठ तुळशीबाग,
नाहीतर shopping mall,
गर्दीत जाण्याची सवय,
आता मोडायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
नवरात्रीचा उत्सव,
गणेशोत्सवाची गर्दी,
धक्काबुक्की आता पूर्ण,
टाळायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
पार्ट्या अन् get-togethers,
भलेमोठे समारंभ!
संयमाची सवय आता,
लावायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
मंदिरात गर्दी,
अन् दर्शनाला रांगा,
घरातच पूजा आरती,
करायला हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
Lockdown संपला जरी,
Curfew उठला तरी,
Mask अन् distancing ची सवय,
अंगी भिनवायलाच हवी,
आता जरा lifestyle,
बदलायलाच हवी!
Comments : 0
You need to login before you can comment. Click here to go to the login page.