Datta Jayanti- कधीतरी दत्तगुरुं जवळ नुसत


Published by: doctorwrites, Tue Dec 29 2020

marathi poem poetry spiritual divine god

असे वाटते देवघरातल्या दत्तगुरुंच्या तसबिरीला पहावे व कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते दिवसभराचा थकवा आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते तसे या गुरूमाऊलीचे प्रेम हृदयात साठवावे कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे आपल्या गुरूमाऊलींकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून घ्यावे मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे शांतपणे दत्तगुरुंकडे पहात रहावे या सगुणरूपी चैतन्यातील आनंद व समाधान अनुभवावे कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे दत्तगुरुंजवळ बसून नामस्मरण करावे अद्वैताचा अनुभव घेऊन त्यात विलीन होऊन जावे आपोआपच आपल्या "मी" चे विसर्जन व्हावे कधीतरी दत्तगुरुंजवळ नुसते बसावे त्यांच्याजवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे ज्याचे त्यानेच अनुभवावे दररोज थोडा वेळ तरी आपल्या दत्तगुरुंजवळ बसावे!! *।। जय श्री गुरुदेव दत्त ।।*🙏






Share Post Link


Comments : 0

You need to login before you can comment. Click here to go to the login page.

No comments yet.

More from doctorwrites

View Posts

Art

One should either be a work of art or wear a work of art.

Photography

Say Cheeez

Facts

Did you know?

Food

I'm not drooling, you are!

Inspiration

One Day or Day One... You Decide

Poetry

Just one beautiful line of poetry can stay with you forever

Fashion

Style is a way to say who you are without having to speak.

Lifestyle & Wellness

Your life only gets better when you do..

Review

Let Me Walk You Through