तलवारीपलिकडील शिवबा कुणी पाहिलाय का?


Published by: SushK003, Fri Mar 06 2020

Syncytium2020 Poetry

तलवारीपलिकडील शिवबा कुणी पाहिलाय का? असत्याचा काळ ठरणारा सत्याची कास धरणारा यवनांना रडवणारा आणि धारातीर्थी मावळ्यांसाठी रडणारा मित्र कुणाला दिसलाय का? कुणब्याघरी भाकरी खाणारा जातीव्यवस्थेवर प्रहार करणारा स्त्रीमुक्तीचा एल्गार पुकारणारा आणि भारतीय लोकशाहीची पायाभरणी करणारा राजा कुणी पाहिलाय का? जुलमी सामंतांचे कान पिळणारा बलात्काऱ्याचे हात कापणारा हिरकणी चा सत्कार करणारा आणि स्वराज्यरक्षक संभाजी सारखा छावा घडवणारा बाप कुणी पाहिलाय का? उद्विग्नतेत अविचल राहणारा विजयांमध्ये स्थिर राहणारा पराभवात स्वाभिमान राखणारा आणि नियतिशी सामर्थ्याने झुंज देणारा असा लढवय्या कुणी पाहिलाय का? मला तुम्हाला विचारायचय खरंच, तलवारीपलिकडील शिवबा कुणी पाहिलाय का? Syncytium 2020 SKNMC & GH






Share Post Link


Comments : 0

You need to login before you can comment. Click here to go to the login page.

No comments yet.

More from SushK003

View Posts

Art

One should either be a work of art or wear a work of art.

Photography

Say Cheeez

Facts

Did you know?

Food

I'm not drooling, you are!

Inspiration

One Day or Day One... You Decide

Poetry

Just one beautiful line of poetry can stay with you forever

Fashion

Style is a way to say who you are without having to speak.

Lifestyle & Wellness

Your life only gets better when you do..

Review

Let Me Walk You Through